Home गडचिरोली माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून डोळे ऑपरेशनकरिता आर्थिक मदत

माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून डोळे ऑपरेशनकरिता आर्थिक मदत

96

– कंकडालवार परिवाराकडून नेहमी गरीब जनतेला मदतीचा हात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील देवलमरी येथील श्रीनिवास नामदेव गद्देपाकवार यांची काही दिवसांपासून नेत्रा (डोळे) निकामी झाल्यामुळे नेत्राची ऑपरेशनकरिता ते तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील एक खाजगी दवाखान्यात जायचे होते. मात्र गद्देपाकवार कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलखीची असल्यामुळे श्रीनिवास गद्देपाकवार यांनी दवाखान्यात जाण्यासाठी आर्थिक अडचण भासत होती.

आज काँग्रेस नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे श्रीनिवास गद्देपाकवार यांनी कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचणबाबत सांगितले होते. त्यांची अडचण बघून एक हात पुढे करत अजयभाऊ कंकडालवार यांनी नेत्र ऑपरेशन करिता आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यावेळी त्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.

यावेळी काँग्रेस नेते व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, माजी जि. प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, महेश लेखूर, प्रकाश दुर्गे, नरेंद्र गर्गमसह आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!