– रेगडी येथील ३५ कोटी रुपयांच्या विकास कामांची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी
– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या विशेष प्रयत्नातून रेगडी येथे भव्य विकास कामांची उभारणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्या विशेष प्रयत्नातून रेगडी येथे मंजूर केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या कामांची पाहणी केली व सदर कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
रेगडीच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये मुलींसाठी १० कोटी रुपयांचे वस्तीगृह, मुलांसाठी १० कोटी रुपयांचे वस्तीगृह, ३.५ कोटी रुपयांचे वसाहत बांधकाम, ४.०७ कोटी रुपयांचे सभागृह व ६.५ कोटी रूपये प्राथमिक आरोग्य केंद्र यासह अनेक विकास कामांचा समावेश आहे. आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विशेष प्रयत्न करून या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही रेगडीच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन या कामांच्या पाहणीच्या प्रसंगी दिले.







