Home गडचिरोली चंद्रभान सातपुते यांचा सेवानिवृत्ती सत्कार

चंद्रभान सातपुते यांचा सेवानिवृत्ती सत्कार

113

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथील स्वयंपाकी चंद्रभान सातपुते हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सहपत्नीक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवार, ६ जुलै रोजी सेवानिवृत्तीपर सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू तसेच त्यांच्या पत्नी मंगला सातपुते यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, माध्यमिक शिक्षिका वर्षा मस्के, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, वरिष्ठ लिपिक योगेश उसेंडी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सातपुते यांच्या सेवाकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. करिष्मा गोवर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!