विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मनमिळाऊ स्वभावाच्या सर्व महिलांना सोबत घेऊन चालणाऱ्या, सर्व समावेशक, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई प्रमोदजी पिपरे यांचा वाढदिवस आज गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

स्थानिक महिला व बाल रुग्णालय येथील रुग्णांना फळवाटप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत इंदिरा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे पात्र महिला लाभार्त्यांचे फार्म भरून घेण्यात आले. एक पेड माँ के नाम या योजनेअंतर्गत इंदिरा गांधी नगर परिषद शाळा इंदिरानगर येथील बाजुला असलेल्या खुल्या पटांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच इंदिरा गांधी चौक येथील शासकीय विश्रामगृह येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गोवर्धनजी चव्हाण, डॉ. भारत खटी, विलासजी भांडेकर, मधुकरजी भांडेकर, डॉ. मिलिंद नरोटे, कविताताई उरकुडे, प्रतिभाताई चौधरी, डॉ. चंदाताई कोडवते, रंजिताताई कोडापे, प्रा. उराडे, केशवराव निंबोळ, राजू शेरकी, देवाजी लाटकर, विलास नैताम, वैष्णवी नैताम, पल्लवी बारापात्रे, त्रिशाताई डोईजड, पूनम हेमके, कोमल बारसागडे, स्वाती चंदनखेडे, विनोद देवोजवार, श्याम वाढई, समय्या पसुला यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहता वर्ग यांनी उपस्थित राहुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.







