Home गडचिरोली सावरगाव पेठ डोंगरीतील विविध समस्या मार्गी लावाव्यात : डॉ. मिलिंद नरोटे

सावरगाव पेठ डोंगरीतील विविध समस्या मार्गी लावाव्यात : डॉ. मिलिंद नरोटे

85

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील सावरगावातील समस्यांना घेऊन दिनांक सोमवार, ८ जुलै २०२४ ला जिल्हा परिषद गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुशी सिंह यांना निवेदन देण्यात आले.

यात मुख्यतः आंबेशिवनी केंद्रांतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळा असून येथील राष्ट्रीय महामार्ग 930 च्या अगदी बाजूला असल्याकारणाने व राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यायी मार्ग काढावे किंवा शाळा इतरत्र स्थलांतरित करावे. १ ते ४ वर्गामध्ये ४० विद्यार्थी ५ ते ७ वर्गामध्ये १९ विद्यार्थी असून यास चार शिक्षक अपेक्षित असताना दोन नियमित शिक्षक आणि गाव पेसा अंतर्गत एक शिक्षक कंत्राटी नुसार असून दोन शिक्षक देण्यात यावे यावर चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर सावरगावात पाण्याची पातळी खालावली असून पिण्याच्या पाण्याच्या अडचणी मागील दोन-तीन वर्षापासून सतत आहेत. वारंवार गावकऱ्यांनी पाठपुरवठा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे करण्यात आले, तरी अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी लागलेला नाही. याकडे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे, याकरिता भाजपा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंद नरोटे, सरपंच सावरगाव रुंदाताई मडावी, सावरगाव ग्रामपंचायत सदस्य महिंद्रा सिडाम, मोनिका गेडाम, अर्चना कुलसंगे, पेसा अध्यक्ष रघुनाथ सिडाम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास सिडाम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य धनराज सिडाम गावकरी निवेदन देताना उपस्थित होते.

error: Content is protected !!