वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ चालू करा : जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे मागणी

191

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील अतिशय मागास व दुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात दळणवळण व इतर सोयीसुविधा सुद्धा कमी आहे. अश्या परिस्थितीत जिल्ह्याला एक नवी ओळख देण्याकरितात व जिल्ह्यातील युवकांचा वैद्यकीय शिक्षणातील दर्जा उंचावण्याकरिता जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणे अत्यन्त गरजेचे आहे. परंतु प्रसार माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय रद्द करून त्या जागी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार असल्याचे सांगितल्या जात आहे. जिल्ह्यात उत्तम आरोग्यसुविधा मिळण्याकरिता सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणे काळाची गरज आहे. परंतू त्याआधी सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज असल्याने तत्काळ वैद्यकीय महाविद्यालच जिल्ह्यात सुरु करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी सोबत युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे सुद्धा उपस्थित होते.