शिर्डी येथे काॅग्रेसचे 2 दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिबिर

69

– माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेवराव उसेंडी यांची सामाजिक न्याय सक्षमीकरण गटामध्ये निवड

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीच्या वतीने 1 जुन व 2 जुन 2022 रोजी शिर्डी येथे अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार नवसंकल्प कार्यशाळा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या नवसंकल्प शिबिरात संघटन आर्थिक गट, शेतकरी आणि शेतमजुर गट, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण गट, सोबतच युवक आणि महिला सक्षमीकरण गट अशा विविध समितीचे गठण करण्यात आले आहेत. माजी आमदार तथा महासचीव डाॅ  नामदेवराव उसेंडी यांची सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण गट समीतीमध्ये निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सामाजिक न्यायाच्या ज्या योजना होत्या त्या बंद केलेल्या आहेत. ओबीसी, एसी, एसटी यांच्यावर अन्याय करणारे जे निर्णय घेतलेले आहेत. त्या विरुध्द नवसंकल्पामध्ये रणनिती आखण्यासाठी सामाजिक न्याय सक्षमीकरण गटाची स्थापना केलेली आहेत या गटामध्ये डाॅ. नामदेवराव उसेंडी यांची निवड करण्यात आली. नवसंकल्प कार्यशाळा शिबिर महा. प्रदेश काॅग्रेस कमिटीचे प्रभारी एच. के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे सर्व राज्यमंत्री, आमदार, प्रदेश काॅग्रेसचे सर्व प्रदेशाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्यासह जिल्हयातील सर्व नेते, प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. असे डाॅ. नामदेवराव उसेंडी यांनी सांगितले.