सर्व विभागांंनी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे प्रामाणिकपणे काम करावे : आमदार डॉ. देवराव होळी

87

– चामोर्शी येथे पार पडली वार्षिक आमसभा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पंचायत समिती चामोर्शी येथे वार्षिक आमसभा आज, 13 मे रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. प्रभारी गटविकास अधिकारी सतीश टिचकुले यांनी आमदार महोदयांना शिविगाळ केल्याने त्यांंच्यावर एफआरआय करून निलंबन करण्यात यावे, असा आमसभेत ठराव घेण्यात आला.

चामोर्शी येथील पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी १३ मे रोजी दुपारी १ वाजता आमदार डॉ . देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत अनखोडा येथील उपसरपंच यांना प्रभारी बीडिओ सतीश टिचकुले यांनी असभ्य भाषेचा वापर केल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख यांच्यासह सरपंच, उपसरपंच व कार्यकत्यांनी त्यांना निलंबित करण्याचा मुद्दा लावून धरल्याने सभा गाजली. सभेला प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी मधुकर काळबांधे, माजी सभापती भाऊराव डोर्लीकर, सहाय्यक गटविकास अधिकारी बि. बी. व्हनखंडे, जि. प. चे माजी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, नायब तहसीलदार लोखंडे, माजी पं. स. सदस्य प्रमोद भगत, प्र. सो. गुंडावार, विनोद गौरकार, नगरसेवक आशिष पिपरे, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, आकुली बिश्वास आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुष यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण झाल्यानंतर शिक्षण विभाग विस्तार अधिकारी मारोती अलोने यांनी राष्ट्रगीत व संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले. तालुक्यातील सरपंच व कार्यकर्त्यांनी अनखोडा येथील उपसरपंच वसंत चौधरी यांच्या बरोबर येथील बीडिओ टिचकुले यांनी असभ्य भाषेचा वापर केल्याप्रकरणी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ चलाख, विनोद गौरकार, महामंत्री साईनाथजी बुरांडे, भाष्कर बुरे, जैराम चलाख, प्रतीक राठी, उपसरपंच शेषराव कोहळे, प्रमोद भगत यांनी हा मुद्दा लावून धरल्याने अखेर ठरावात फौजदारी कारवाई व निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. कृषी विस्तार अधिकारी बोरकुटे यांनी १३ फेब्रुवारी २०२० च्या वार्षिक आमसभेचे कार्यवृतांत वाचून यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान घरकूल, बससेवा, कृषीपंप व घर विजजोडनी, रस्ते, विजबिल, राशन कार्ड, घरकुल मंजूर आहे परंतु निधी उपलब्ध नसल्याने घरकुल बांधकाम केव्हा करणार ? असा प्रश्न सोनापूरचे सरपंच शेषराव कोहळे यांनी उपस्थित केला. तसेच कढोली येथील सरपंच व विविध गावातील सरपंच व उपसरपंच यांनी घरकुल संदर्भात असलेल्या अडचणी आमसभेत मांडले. असता घरकुल संदर्भात सात दिवसात सरपंच व ग्रामसेवक , घरकुल संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक घेण्याचे निर्देश सभा अध्यक्षांनी दिले. तसेच मागील अनुपालन विषयांवर चर्चा करण्यात आली व वार्षिक आमसभेला गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे दोन वर्षाचे वेतनवाढ थांबविण्यात यावे, असा ठराव घेण्याच्या सूचना दिल्या. यापुढे होणाऱ्या वार्षिक आमसभेत नगरंचायत अध्यक्ष व मुख्याधिकरी यांना पाचारण करण्यात यावे व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी या नगरपंचायतीकडे हस्तत्रित करण्याचा मुद्दा नगरसेवक आशिष पिपरे यांनी उपस्थित केला. यावेळी आमसभेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी गावाच्या विकास आराखड्यामध्ये जनतेने मांडलेल्या समस्या घेऊन आराखड्यानुसार कामे करावी व सर्व योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला लाभ देण्यात यावा, असे संबोधित केले. सभेचे प्रास्ताविक प्रभारी गटविकास अधिकारी मधुकर काळबांधे यांनी तर संचालन शिक्षण विस्तार अधिकारी मारोती अलोने यांनी तर आभार कृषी विस्तार अधिकारी बोरकुटे यांनी मानले. सभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य व विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.