जनसामान्यांच्या हाकेवर धावून जाणारे स्व. नरेंद्रभाऊ तांगडे यांचे होते उत्तम व्यक्तिमत्त्व : महेंद्र ब्राम्हणवाडे

127

– स्व. नरेंद्रभाऊ तांगडे यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ चकविरखल येथे 39 जणांनी केले रक्तदान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सावली तालुक्यातील चकविरखल येथे स्व. नरेंद्रभाऊ तांगडे यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे ऊद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले. स्व. नरेंद्रभाऊ तांगडे जनसामान्यांच्या हाकेवर अर्ध्या रात्रीही धावून जाणारे उत्तम व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर सारखे सामाजिक उपक्रम राबवून चकविरखल च्या युवकांनी खऱ्याअर्थाने नरेंद्रभाऊंना आदरांजली दिली, असे मत महेंद्र ब्राम्हवाडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, उपाध्यक्ष म्हणुन शंकरराव सालोटकर, राजुभाऊ सिध्दम, जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली सुनिल चटगुलवार, पांडुरंगजी तांगडे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल बोमनवार, सरपंच गायडोंगरी
मुक्तेश्वर आभारे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मिथून बावनवाडे, निखिल भोयर, पियूष भोयर, खुशाल गुरनुले, तुळशीराम तांगडे, गिरिधर कांबळे, गणेश कांबळे, सचिन बावनवाडे, वैभव चुधरी, मोहित मेश्राम, परशुराम नंन्नावारे, करण राऊत, मनोज वंजारी, दिनेश भोयर, लालजी मुनघाटे, सत्यपाल चापले, संतोष कांबळे, पंकज भोयर, हंसराज रोहनकर, स्वप्नील आभारे, अतुल बकाल, अंकुश मेश्राम, रत्नाकर शेरकी, रुपेश आभारे, यश गेडाम, दिलीप आभारे, उत्तम बकाल, सूरज अलमस्त, नितेश ठाकरे, आनंद मेश्राम, उज्ज्वल रायपुरे, विजय रमगुंडे, ओमेश्वर चोधरी, पवन बावनवाडे, प्रयाण शेरखी इत्यादी युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून स्व. नरेंद्रभाऊ तांगडे यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे आयोजनासाठी ईश्वरजी गंडाटे, गोविंदाजी बकाल, मंगलदासजी अलमस्त, मुखरुजी, निकुरे, देवराव आभारे, शेखर नागापुरे, मिथून बाबनवाडे, दिवाकर बाबनवाडे, मधुकर बट्टे, सुखदेव बाबनवाडे, आंनदराव भोयर आदींनी परिश्रम घेतले.