घरकूल बांधकामासाठी स्वामित्व धन न आकारता गणपूर रेती घाटावर आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते लाभार्थी यांना रेती वाटप

65

– आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गेल्या अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातील घरकूल लाभार्थी व संडास बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब घरकूल योजना व शौचालय बांधकाम करण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत होता. या विषयावर गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढला व गडचिरोली जिल्ह्यातील उपलब्ध रेती घाटावरून घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती व शौचालय लाभार्थ्यांना दोन ब्रास रेती देण्याचा राज्य शासनाचा निर्णय असून सदर रेती सबंधित गाव जवळील रेती घाटावरून सबंधित लाभार्थी यांना द्यायचे होते. परंतु तालुका स्तरावरील प्रशासनास याची माहिती नव्हती.
हा विषय आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाकडे लावून धरला व आजपासून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गणपूर घाटावरून घरकुल योजना व शौचालय लाभार्थी यांना तहसील कार्यालयाकडून स्वामित्व धन न आकारता
उपविभागीय अधिकारी तोडसाम, तहसीलदार नागटिळक, संवर्ग विकास अधिकारी टििचकुले, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते त्या भागातील पंचायत समितीच्या यादी नुसार उपस्थित लाभार्थी यांना रेतीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने येथील उपसरपंच भोयर पाटील व हजारे पाटील व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार डॉ. होळी यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील समस्त ग्रामपंचायत यांनी आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल व शौचालय बांधकाम लाभार्थी यांना रेती उपलब्ध करून देण्याचे आव्हान केले.