संघर्षाचा महामेरू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महेंद्र ब्राम्हणवाडे

146

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले सत्याग्रह, धर्मांतराचा घेतलेला निर्णय आणि मानवाच्या न्याय- हक्कांसाठी संविधानिक लढा हे संघर्षाचे प्रतिकात्मक रूप होते. हजारो वर्षांपासून इथल्या दलित- शोषित- पीडितांचे माणूस म्हणून जगण्याचे सर्वच अधिकार हिरावून घेतलेल्या व शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मूक लोकांमध्ये स्फूर्ती व नवऊर्जा निर्माण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले असून ते खरे संघर्षाचे महामेरू होते, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. कोंढाळा (तालुका वडसा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाच्या उद्घाटन समारोहप्रसंगी ते बोलत होते.
तर बाबासाहेबांचे विचार घरा घरा पर्यत पोहचवून संविधान जनजागृती करावे, असे मत आरमोरी विधानसभेचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते, यावेळी मुख्य अतिथी म्हणून ऍड. संजय गुरू, सरपंच अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोटे, माजी जि. प. सदस्य विश्वनाथ भोवते, पो. पा. किरणताई कुंभलवार सह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेणारे युवक काँग्रेसचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते, पं. स. देसाईगंज माजी उपसभापती नितीन राऊत, टेंंभुर्णेे सर, AWD कार्यालय रविंद्र उरकुडे, प्रवीण रहाटे पत्रकार आरमोरी, सह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने गावकरी व समाज बांधव उपस्थित होते.