Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

146

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा कॉंग्रेस कमिटी आणि अनुसूचित विभाग काँग्रेसच्या वतीने अंधारात खितपत पडलेल्या आणि जाती, जातीमध्ये विखुरलेल्या बहुजन समाजाला प्रकाशित करून अनंत काळापासून गुलामगिरीच्या खोल विहिरीमध्ये डुबलेल्या बहुजन समाजाला वर काढून दुनियेचे दर्शन घडवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. शिबिराचे उद्घाटन माजी खासदार मारोतरावजी कोवासे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे, महराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेसचे जेष्ठ नेते हसनअली गिलानी, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा महासचिव समशेरखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, विश्वजीत कोवासे, दिपकभाऊ मडके, काँग्रेस नेते दामोदर मंडलवार, नंदु कायरकर, समय्या पशुला, हरबाजी मोरे, संजय चन्ने, सदाशिव कोडापे, पंडित पुडके, बाबुराव गडसुलवार, आय. बी. शेख, अरुण पुण्यप्रेद्दिवार, अरुण भादेकर, अतुल तुमपल्लीवार, अब्दुलभाई पंजवानी, महादेव भोयर, संजय नेरकर, अनिल कोठारे, रेहान शेख, दिलीप घोडाम, अपर्णा खेवले, आशा मेश्राम यासह अनेक मान्यवर तसेच आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. ऋषिकेश देशमुख, राहुल वाळके, विजया मंडाले, योगीता कातंगे, अतुल बांबोळे, प्रफुल राऊत, भाग्यश्री मेश्राम, पंकज निखाडे उपस्थित होते. यावेळी रविंद्र सहारे, संजय चन्ने, संजय शिंपी, राजसिधार्थ पशुला, राकेश गडपायले, योगेश्वर देवलवार, अजय नरोटे, विशाल बनसोड, योगेश गोवर्धन, देवराव भुरसे, भूषण कुनघाडकर, प्रफुल बारसागडे, संतोष बारसिंगे आदी रक्तदात्यांनी रक्त देऊन बाबासाहेबांना आदरांजली दिली.

error: Content is protected !!