नक्षलवाद्यांकडून दोन आदिवासी युवकांची हत्या

430

– गट्टा (जां) परिसरात दहशतीचे वातावरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील दोन आदिवासी युवकांची नक्षलवाद्यांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना पोलीस मदत केंद्र गट्टा (जां) हद्दीत बुधवारच्या रात्री घडली. या घटनेमुळे गट्टा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगेश मासा हिचामी (वय २७ वर्ष) रा. झारेवाडा व नविन पेका नरोटे (वय २५ वर्ष) रा. गोरगुट्टा असे नक्षल्यांनी हत्या केलेल्या युवकांची नावे असून एक पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून तर दुसरा आत्मसमर्पित नक्षली असल्यावरुन नक्षल्यांनी हत्या केल्याची माहिती आहे.

नक्षल्यांनी मंंगेश हिचामी व नविन नरोटे यांंना बुधवारच्या रात्री घरातून बळजबरीने घेऊन गेले व त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह रस्त्यावर आणून ठेवले. या घटनेमुळे गट्टा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तिव्र केल्याची माहिती आहे.