राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील चामोर्शी रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात २३ मार्च रोजी दुपारी १ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फ्रंट व सेलचे राज्य समन्वयक सुहास उभे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर), राकाँपा जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, माजी नगरसेवक तथा जिल्हा सचिव श्रीकांत भृगुवार, तालुकाध्यक्ष विवेक ब्राम्हणवाडे, शहर कार्याध्यक्ष कपिल बागळे, माजी नगरसेविका संध्या उईके, महिला शहर अध्यक्ष मिनल चिमुरकर, तालुकाअध्यक्षा निता बोबाटे, चामोर्शी तालुका महिला निरीक्षक आरती कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश समन्वयक सुहास उभे यांनी सर्व कार्यकर्त्यांना राज्य सरकारच्या सर्व योजना खेड्यापाड्यातील जनसामान्यांंपर्यंत पोहचवून त्यांचा लाभ करून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम (हलगेकर), जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनीही बैठकीला मार्गदर्शन केले. सदर बैठकीचे प्रास्ताविक भाषण विजय गोरडवार यांनी केले तर सूत्रसंचालन लिलाधर भरडकर यांनी केले. यावेळी अमर खंडारे, प्रा. चंद्रशेखर गडसुलवार, अशोक कत्रोजवार, राजु डांगेवार, अमोल कुळमेथे, प्रसाद पवार, सुषमा येवले, रेखा सहारे, रेखा कोराम, आशा मेश्राम यांच्यासह शहरातील तथा गडचिरोली तालुक्यातील बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.