विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : बांबूपासून इथेनाल, वीज निर्मिती केंद्र, फर्निचर, अगरबत्तीच्या काड्या, कपडे, टी-शर्ट, टूथब्रश इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करण्याचे कारखाने काढण्यासाठी स्थानिक पत्रकार भवन येथे गुरुवार, २४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व बांबूपासून तयार झालेल्या साहित्यांची विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग निर्माण करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी नेते (माजी आमदार) पाशा पटेल, बांबू फर्निचरचे जागतिक तज्ञ संजय करपे, बांबूपासून कापड निर्मितीचे तज्ञ आशिष कासवा उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक-युवती, ग्राहक तसेच मानवजात वाचविण्यासाठी ज्यांची तळमळ आहे, अशा सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाजसेवक प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.