पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते गडचिरोली एकल कार्यालयाचे भूमिपूजन

97

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 01/03/2022 ला नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडचिरोली एकल कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर पोलीस दल पोलीस दादालोरा खिळकी अंतर्गत गडचिरोली महोत्सवाच्याा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मंत्री महोदयांचे रेला नृत्य सादर करून स्वागत करण्यात आले. या महोत्सवात परंपरागत जिल्ह्यातील नैसर्गिक वनोपजापासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू ,पदार्थ आणि वन औषधी इत्यादीचे स्टाँँल लावण्यात आले होते. नैसर्गिक संपदाने नटलेल्या या जिल्ह्याच्या संर्वांगिन विकासाकरिता सर्वोतोपरी कार्य करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू, असे भाषणातून सांगण्यात आले. गडचिरोली शहर प्रमुख रामकिरत यादव, माजी नगराध्यक्ष अश्विनी यादव यांच्यातर्फे नुकताच पार पडलेल्या राज्यस्तरीय विविध क्रीडामध्ये विजय प्राप्त केलेल्या खेडाळुंचा मनोबल उंचावण्यासाठी मंत्री महोदयांच्या हस्ते सर्व खेडाळुंना मानचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, वासुदेव शेडमाके, रियाज शेख, उपजिल्हा प्रमुख राजूभाऊ कावळे, विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे, शहर प्रमुख रामकिरित यादव, माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विन यादव, युवा सेना जि. प्र. दिपक भारसाकडे, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.