नवेगाव येथे हनुमान मंदिराचे लोकार्पण व मुरखळा येथे सीसी रोडचे भूमिपूजन

128
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : लगतच्या नवेगाव ग्रामपंचायत अंतर्गत मुरखळा येथे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या निधीतून नवेगाव (मुरखळा) चे उपसरपंच राजेंद्र खंगार यांच्या प्रयत्नातून बांधकाम करण्यात आलेल्या हनुमान मंदिराचे लोकार्पण आज करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, सरपंच दशरथ चांदेकर, संजय निखारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदकिशोर मांदाडे, ग्रामपंचायात सदस्य जीवन कुत्तरमारे, सदस्य प्रकाश मुद्दमवार, सदस्य विभाताई उमरे, प्रतिष्ठित नागरिक मांदाडे गुरूजी, डॉ. अविनाश शंखदरबार, भाजपा तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे व इतर गावकरी उपस्थित होते.
याशिवाय पंचायत समिती सभापती मारोतराव ईचोडकर यांच्या 15 वित्त आयोग निधीअंतर्गत नवेगाव (मुरखळा) ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मुरखळा येथे नामदेव मेश्राम यांच्या घराजवळ सिमेंट-काँक्रीट रोडच्या बांधकामांचे भूमिपूजन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, सरपंच दशरथ चांदेकर, उपसरपंच राजेंद्र खंगार, पारडीचे सरपंच संजय निखारे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, ग्रामपंचायत सदस्य जीवन कुत्तरमारे, प्रकाश मुद्दमवार, सदस्य विभाताई उमरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदकिशोर मांदाडे, डॉ. अविनाश शंखदरबार व इतर गावकरी उपस्थित होते.