विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : 11 फेेब्रुवारी 2022 रोजी धानोरा तालुक्यातील निमगाव येथे अभिनय नाट्य कला मंडळ निमगाव यांच्या सौजन्याने “सुन लाड़की या घरची” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर शेतकरी शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच्याच एक भाग म्हणून निमगाव येथे अभिनय नाट्य कला मंडळ निमगाव यांच्या सौजन्याने “सुन लाड़की या घरची” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे अध्यक्ष शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार हे होते तर उद्धघाटक म्हणुन जिल्हा परिषद गड़चिरोलीचे उपाध्यक्ष मनोहर पााटील पोरेटी हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ जिवानी, भाजपा तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, यादवजी लोहबरे, संदीप भुरसे, नरेंद्र उईके, बोरकुटे धान व्यापारी, अशोकजी हलामी, रामगुण्डावार, राजुभाऊ ठाकरे, भोयर, तसेच अभिनय नाट्य कला मंडळ बेलगावचे सदस्य जगन्नाथ रजगड़े, पुंडलिक तड़से, पुरुषोत्तम राजगड़े, विश्वनाथ वरखडे, आनंदराव बरडे, वामनजी सिडाम, भजन वरखडे, केशव मेश्राम, राजेंद्र सहारे, पंढरी सुरपाम, पत्रुजी जुवारे, नानाजी कोवे, विजय मेश्राम, चंद्रशेखर पदा, खुशाल जांगी, अनंता मेश्राम, जयदेव पदा, रूपेश गावड़े, जयदेव मड़ावी, राजेंद्र वरखडे, संदीप वरखडे यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.