कारगील चौकात लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण

80

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली कार्यक्रम कारगील चौक गडचिरोली येथे सामाजिक, राजकीय, पत्रकार बांधव, अन्य चळवळीतील मान्यवरांंसह शहरवासियांंनी वाहिली.

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोलीच्या वतीने हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला. इथे लतादीदींंनी गायलेले गाणे दिवसभर सुरु होते. लतादीदींंचे गाणे एकूण शहरवासीय रमनाम झाले. जेष्ठ नागरिक भाऊराव कोडापे, भय्याजी चिचघरे यांनी सर्वप्रथम श्रद्धांजली वाहिली. यावेळी जानव्ही राजेंद्र साळवे, नंदू कुमरे यांनी लतादीदींंच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शेकडो नागरिक, महिलांनी मेणबत्ती व फुलं वाहून गानकोकिळा लतादीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, प्रकाश भांडेकर, रेवनाथ गोवर्धन, नरेंद्र चन्नावार, डॉ. नरेश बिडकर, सुनील देशमुख, नगरसेवक संजय मेश्राम, पुरुषोत्तम शेंडे, राजू पुंडलिककर, नंदू कुमरे, जेष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर, हरबाजी मोरे, कैलाश शर्मा, श्याम कोल्हटकर, सुचिता धकाते, नीलिमा देशमुख, कविता साळवे, सौ. मिरगे, मधुकर चिचघरे आदी उपस्थित होते.