भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे डिजिटल सदस्यता नोंदणी अभियान सुरू

91

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने डिजिटल सदस्यता नोंदणी अभियान सुरू केले असून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, कुरखेडा, वडसा तालुक्यातील सदस्यता नोंदणी प्रशिक्षण शिबीर व आढावा बैठकीचे आयोजन 10 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्यांना काँग्रेसची विचारधारा जनसामान्यांंपर्यंत पोहचवून अधिकाधिक सदस्यता नोंदणी करत पक्ष संघटन अधीक मजबूत करण्याचे निर्देश देत सदस्यता नोंदणी करण्यासंदर्भात प्रात्यकक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले. यावेळी जिल्हा सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, आरमोरी ता.अध्यक्ष मनोज वनमाळी, कुरखेडा ता.अध्यक्ष जयंत हरडे, वडसा ता. अध्यक्ष परसराम टिकले, कुरखेडा तालुक्यातील माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन पा. नाट, प्रभाकर तुलावी, आशाताई तुलावी, दामोदर वटी, तुकाराम मारगाये, रामचंद्र पुराम, पुंडलिक निपाने, गिरीधर तितराम, नीलकंठ आलाम, दादाजी आळे, मंगेश वालदे, अरुण उईके, उमाजी दुर्वे, समीर शेख, इर्शाक शेक, उद्धव कापगते, संजय पोटेती, हेमलता नंदेश्वर, संध्याताई चिमुरकर, शोएब पठाण, उस्मान पठाण, वडसा तालुक्यातील काँग्रेस जेष्ठ नेत्या आरती लहरी, निलोपर शेख, लतीफ रिजवी, नितीन राऊत, राजू आखरे, भूषण अलामे, प्रकाश समर्थ, नंदू नरोटे, जमाल शेख, राजू रासेकर, हरिष मोटवणी, क्षीरसागर शेंडे, राजन बुले, ठाकरे पाटील, नरेश लिंगायत, पिंकू बावणे, विपुल येलट्टीवार, शमीला कराडे, मेघा गजघाटे, सुनीता नंदेश्वर, भारती कोसरे, मनीषा रेटे, सोनल घोरमोडे, मंदा पेंदरे, वंदना हर्षे, शांता धुले, आरमोरी तालुक्यातील जि. प. सदस्या मनीषाताई डोनाडकर, राजुभाऊ गारोदे, शालीक पत्रे, कमलेश खान्देशकर, पंं. स. सदस्या वृंदाताई गजभिये, नगरसेविका निर्मलताई किरमे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, रोषनीताई बैस, अंकुश गाढवे, नीलकंठ गोहणे, प्रवीण राहाटे, निशांत वनमाळी, दिगंबर चौधरी, प्रेमीला गजभिये, श्रीनिवास आंबटवार, विनायक रासेकर यांच्यासह अनेक काँग्रेस नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.