त्याग आणि बलिदानाची मूर्ती रमाबाई आंबेडकर : ना. विजय वडेट्टीवार

115

– जिल्हा काँगेस कमिटी अंतर्गत अनुसूचित जाती विभाग काँगेसच्या वतीने रमाबाईंना अभिवादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : त्याग आणि बलिदानाची मूर्ती म्हणजे रमाबाई आंबेडकर असून त्यांच्या त्यागामुळेच भीमराव हे बाबासाहेब आंबेडकर बनू शकले, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहूजन कल्याण मंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत अनुसूचित जाती विभागाच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेस नेते संदीप गड्डमवार, जि. प. सदस्य तथा काँग्रेस नेते अँड. रामभाऊ मेश्राम, दिनेश चिटमुलवार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सोशल मीडिया प्रदेश महासचिव नंदूभाऊ वाईलकर, दामोदर मंडलवार, जितेंद्र मुनघाटे, दिवाकर निसार, ढिवरु मेश्राम, वसंत राऊत, गौरव येणप्रेड्डीवार, खुशाल चहारे, अरुण भांडेकर पौर्णिमा भडके, आशा मेश्राम, ललिता उंदिरवाडे, कल्पना नंदेश्वर, नलिनी शिंदे, वर्षा गुलदेवकर, वंदना ढोक, आशा शिंदे, रिता गोवर्धन यांच्यासह काँगेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.