जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समितीची सभा संपन्न

111

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात जलव्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली.

सदर सभेत जिल्ह्यातील सर्व गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली पाहिजे. सर्व नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याबाबत योजना राबविण्यात यावी, तसेच सिंचनाचे सुविधा व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरटी, कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, समाज कल्याण सभापती रंजनाताई कोडापे, बांधकाम सभापती युधिष्टिर बिश्वास व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार उपस्थित होते.