कारगील चौकात आज लता मंगेशकर यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम कारगील चौक गडचिरोली येथे 8 फेब्रुवारी 22 ला संध्याकाळी 6:30 वाजता आयोजित केला आहे.

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोलीच्या वतीने हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला असून येथे लता दीदींंनी गायलेले गाणे दिवसभर सुरु राहणार आहेत. तरी नागरिकांनी मेणबत्ती व फुलं सोबत आणून इथे गानकोकिळा लतादीदी यांना श्रद्धांजली अर्पित करावी, असे आवाहन अध्यक्ष उदय धकाते यांनी केले आहे.