अहेरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाकरिता आदिवासी विद्यार्थी संघाकडून नामांकन दाखल

135

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी आमदार दिपक आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, पं. स. सभापती भास्कर तलांडे, जि. प. सदस्य अजय नैताम यांच्या उपस्थितीत अहेरी नगरपंचायत नगराध्यक्ष पदाकरिता 14 फेब्रुवारीला नगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करायचे होते. आदिवासी विद्यार्थी संघाकडून नगराध्यक्ष पदाकरिता रोजा शंकर करपेत हिचा अर्ज दाखल करण्यात आला असून आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपक आत्राम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात अहेरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामानिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि. प. सदस्य अजय नैताम, नवनिर्वाचित नगरसेवक रोजा शंकर करपेत, मिना माणिक ओंडरे, सुरेखा विलास गोडसेलवार तसेच आविसं शहराध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच विजय कुसनाके, पराजित उमेदवार, साईनाथ ओैतकर, राजकुमार गुरनुले, विमल सिडाम, माया येलुरकर, सरिता कांडुरवार, आसमा शेख, विजसलक्ष्मी कामीडवार,आविस कार्यकर्ते ईरशाद शेख,आरफज शेख, प्रकाश दुर्गे, नरेंद्र गर्गम, विनोद रामटेके, जुलेख शेख, कार्तीक तोगम, मिलींद अलोने, शाम ओंडरे, सल्लमभाई, लक्ष्मण आत्राम आदी उपस्थित होते.