पुसावंडी येथे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

151

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जय गोंडवाना क्रिकेट क्लब पुसावंडी (सोडे) यांच्या सौजन्याने धानोरा तालुक्यातील पुसावंडी (सोडे) येथे ६ फेब्रुवारी २०२२ ला मनोहर पा. पोरेटी यांंच्या पटांगणावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर क्रीडा स्पर्धेसाठी पहिला, दुसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत. एकूण ४२ संघांनी भाग घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा काँग्रेस कमिटी प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सहउद्घाटक परशुराम हलामी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोडे येथील ग्रा. पं. सरपंच पुनमताई किरंगे, तालुका काँग्रेस शहराध्यक्ष मिलिंदभाऊ किरंगे, पुसावंडीचे पो. पा. शंकर दुग्गा, ग्रामसेविका गेडाम, रोजगार सेवक प्रफुल किरंगे, ग्रा. पं. सदस्य लताताई दुग्गा, आसाराम पदा, देविदास दुग्गा, कोल्हे सर, माणिक दुग्गा, इंदूरकर, किरंगे सर, सचिन गेडाम, नरेश पल्लो, उमन हलामी, प्रकाश कोवा, सचिन हलामी, तुकाराम नैताम, जय गोंडवाना क्रीडा मंडळ अध्यक्ष भाषल हलामी, अभय कुमोटी, उपाध्यक्ष वैभव कल्लो, संदीप हलामी, सचिव अभिषेक कुमोटी, सहसचिव अमित दुग्गा, क्रीडाप्रमुख अभय हलामी, सुरज पदा, वृषव कल्लो, कोषाध्यक्ष किशोर आत्राम, आशिक हलामी, अजय उसेंडी, कृणाल हलामी, सुमित कोवा, दक्ष कल्लो आदी बहुसंख्य गावकरी मंडळी व स्पर्धेत भाग घेतलेले पुसावंडी – कुसुमटोला परिसरातील खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेचे संचालन प्रफुल किरंगे यांनी केले. आभार प्रदर्शन अभय कुमोटी यांनी केले.