भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

73

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात आज सायंकाळी ६ वाजता गानकोकिळा, गानसम्राज्ञी, भारतरत्न लताताई मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी न. प. उपाध्यक्ष अनील कुनघाडकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर कुंभरे, उपाध्यक्ष सोमेश्वर धकाते, राजू शेरकी, पूनम हेमके, हरिदास होकम, ओमकार भगत, सुनील कावळे, बबलू पठाण तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.