जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद द्या : आमदार डॉ. देवरावजी होळी

93

– आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना सन २०२२-२३ राज्यस्तरीय बैठकीला मंत्रालय आदिवासी विभागाच्या सचिवांच्या दालनात उपस्थित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने जिल्ह्याच्या मानव निर्देशांक वाढीसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे मा. सचिव आदिवासी विकास विभाग यांच्या दालनात झालेल्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2022-23 राज्यस्तरीय बैठकीत केले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांचेसह आदिवासी विकास विभागाचे सचिव व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेत गडचिरोली जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.