प्रभाग क्रमांक 9 व 11 येथे ‘मन की बात’ कार्यक्रम

94

– पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी साधला ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेन्द्रजी मोदी ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. रविवारी भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहरातील विविध प्रभागात हा कार्यक्रम घेण्यात आला

गडचिरोली शहरातील प्रभाग क्रमांक 9 व 11 येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेवक केशव निंंबोड, माजी नगरसेविका रंजना गेडाम, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, भाजपा कार्यकर्ते जनार्धन साखरे, विलास नैैैताम, वॉर्डातील नागरिक प्रभाकर पिपरे, मनोहर भांडेकर, गोलु नैताम, गंगाधर टिंगसले यांंच्यासह भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुख तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.