कोविड योध्यांचे थकीत मानधन देण्याकरिता ना. विजय वडेट्टीवार 8 करोडचा निधी उपलब्ध करून देणार

110

– काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या प्रयत्नांना यश

गडचिरोली : मागील दोन वर्षा पासून संपूर्ण देशात कोरोन महामारीने थैमान घातले असताना अशा परिस्थितीत मायक्रोबायोलाजिस्ट, टेकनिशीअन, असिस्टंट, अटेंडेंट, वॉर्ड बॉय सारख्या अनेक वैद्यकीय व अवैद्यकीय पदांवर कोविड योध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वोतोपरी प्रयत्न करून कोविड रुग्णालयात सेवा दिली. परंतु मागील सहा महिन्यांपासून यांना मानधन मिळाले नसून यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्रााम्हणवाडे यांच्याकडे थकीत मानधन मिळवून देण्याची मागणी केली. या मागणीचा महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या कडे पाठपुरावा केले असता मा. मंत्रिमहोदयांनी कोविड योध्यांचे थकीत मानधन लवकरात लवकर मिळावे याकरिता आपण ८ करोडचा निधी ८ दिवसांंच्या आत तत्काळ उपल्बध करून देणार असल्याचे सांगितले.