5 नगरपंचायतीमधील उर्वरित 11 जागांसाठी सरासरी 85.38 टक्के मतदान

85

– गुरुवारी होणार मतमोजणी 

विदर्भ क्रांती न्यूज

 गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. यात अहेरी नगरपंचायतीकरिता  649 मतदारांनी (स्त्री – 320, पुरुष – 329 मतदार, एकूण टक्केवारी 80.82), सिरोंचा नगरपंचायतीकरीता 900 मतदारांनी (स्त्री – 475, पुरुष – 425 मतदार, एकूण टक्केवारी 81.23 ), चामोर्शी येथे 2375 मतदारांनी (स्त्री – 1178, पुरुष – 1197 मतदार, एकूण टक्केवारी 88.32), धानोरा येथे 272 मतदारांनी (स्त्री – 141, पुरुष – 131 मतदार, एकूण टक्केवारी 89.77), कुरखेडा येथे 676 (स्त्री – 351, पुरुष – 325 मतदार, एकूण टक्केवारी 84.18 ), यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. मतदानाची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत होती. यात सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. पाच नगर पंचायतीच्या प्रभागासाठी निवडणूक घेण्यात आली. मतमोजणी गुरुवार, 20 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली.