शेकडो कार्यकर्त्यांसह न. प. चे माजी सभापती विजय गोरडवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

93

– माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले कार्यकर्त्यांंचे स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील शेकडो कार्यकर्त्यांसह गडचिरोली नगर परिषदेचे माजी सभापती विजय गोरडवार यांनी माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सदर कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुप्पटा घालून त्यांंचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदााधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांच्या प्रवेेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून आगामी निवडणुकांंमध्ये या पक्षाला मोठी मदत होण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. पक्ष प्रवेशाप्रसंंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदााधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.