जनसुविधेची कामे जिल्हा परिषदेला न देता थेट ग्रामपंचायतींना द्या : आमदार डॉ. देवरावजी होळी

123

– जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत आमदार डॉ. देवरावजी होळी यांची मागणी

– स्थानिक आमदार व खासदार यांना विश्वासात घेतल्याशिवाय जनसुविधांची कामे न करण्याची मागणी

– पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची आभासी पद्धतीने बैठक संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येणारी जनसुविधेची कामे योग्यप्रकारे होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने सदर कामे थेट ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आभासी पद्धतीने झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीमध्ये केली.

मागील एक वर्षापासून जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधांची कामे करताना केवळ वैयक्तिक स्वार्थ व वैयक्तिक राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सदर कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले जात नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता कामे केली जातात. सदर कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे. स्थानिक आमदार व खासदार यांना विश्वासात घेतल्याशिवाय जनसुविधांची कामे करण्यात येऊ नये, अशीही मागणी या बैठकीच्या वेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली.