खा. अशोक नेते व आ. बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चिमूर तालुक्यातील नेरी परिसरातील विविध पुलांंच्या बांधकामाचे भूमिपूजन

232

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील नेरी ते मोटेगाव रस्त्यावर साखळी क्र. ९/४८० वर २० मीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच चिमूर तालुक्यातील आंबोली ते डोमा रस्त्याचे भूमिपूजन, मासळ बूज ते खांबाला रस्ता, गोंदेडा ते केवाडा रस्ता, नेरी ते मोटेगाव रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन, नेरी ते वाघेडा रस्त्यावरील पूल तसेच नेरी ते सोनेगाव ते चिमूर रस्त्यावरील पूल इत्यादी पूल व रस्त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पूल व रस्ता बांधकामाचे भूमिपूजन काल 17 जानेवारी 2022 रोजी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूरकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्यामजी हटवादे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, जि. प. सर्कल प्रमुख संदीप पिसे, विनोद चोखरे, कलीम शेख, नरेंद्र पंधरे, अजित सुकारे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.