विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ७ वी पर्यंत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. छल्लेवाडा येथील नागरिकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि. प. अध्यक्ष यांनी सन २०२१-२२ जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सदर वर्गखोली मंजूर केले असून सदर वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर भूमिपूजन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी सभापती तथा विद्यमान पं. स. सदस्या सुरेखा आलाम, रेपनपली ग्रामपंचायत सरपंचा लक्ष्मी मडावी, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, उपसरपंच विलास नेरला, ग्रांं. प. सदस्य राहुल सुंदिला, अशोक झाडे, संतोष गावडे, लक्ष्मण कोडापे, वरलक्ष्मी झोडे, प्रणाली मडावी, पूजा रामटेके, पूजा माहूलकर, छाया सड़मेकहोते. यावेळी आविस पदाधिकारी विलास बोरकर, दासु कांबडे, देवाजी माहूलकर, गुलाब देवगडे, महेंद्र रामटेके, मोंडी कोटरंगे, श्रीनिवास ठाकरे, विलास सिडाम, वासुदेव सिडाम, किष्टाया गुरनूले, वसंत चव्हाण, प्रभाकर लेनगुरे, लक्ष्मण जनगम, मनोहर भासरकर, शंकर भासरकर, रवि दुर्गे, वैयकुंटम आकदर, व्येंकटेश दहागावकर, भानेश ताटिपली, सोनलाल चापले, संजय चकिनालवार, हंनमंतू ठाकरे आदी उपस्थित होते.