गडचिरोली जिल्हयात 1247 कोरोना तपासण्यांपैकी 108 कोरोनाबाधित, तर 39 कोरोनामुक्त 

94

विदर्भ क्रांती न्यूज

 गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 1247 कोरोना तपासण्यांपैकी 108 नविन कोरोना बाधित झाले असून 39 जणांंनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 31313 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30217 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 349 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.50 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.11 टक्के तर मृत्यू दर 2.39 टक्के झाला आहे. आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 64, अहेरी तालुक्यातील 18, आरमोरी तालुक्यातील 2, भामरागड तालुक्यातील 8, चामोर्शी तालुक्यातील 4, धानोरा तालुक्यातील 4, एटापल्ली तालुक्यातील 1, मुलचेरा तालुक्यातील 1, सिरोंचा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 1 आणि वडसा तालुक्यातील 4 जणांंचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 39 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 23, चामोर्शी तालुक्यातील 11, एटापल्ली तालुक्यातील 3, सिरोंचा तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.