काँग्रेस हा कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाने मोठा झालेला पक्ष : महेंद्र ब्राम्हणवाडे

117

– मालेवाडा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

– भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला. काँग्रेस हा कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाने मोठा झालेला पक्ष आहे. तर भाजप हा फक्त “जाहिरातबाजी निर्भर” पक्ष आहे. स्वतःच्या अहंकारासाठी व आपल्या उद्योगपती मित्रांसाठी 600 पेक्षा अधिक लोकांचा जीव घेणार सरकार ही एकच ओळख भाजपची झाली आहे. त्यामुळे ह्या हुकूमशाही सरकारचा निषेध करत आज शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पक्षातून निघूून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ह्या सर्वांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्ष बळकटीस एक नवी ऊर्जा निर्माण होईल व पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केला. यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना संबोधत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या हस्ते पार पडले. तर मुख्य अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेवराव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, हसनअली गिलानी, वामनराव सावसाकडे, जीवन नाट, आनंद आखरे, सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, तालुका अध्यक्ष जयंत हरडे, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, जि. प. सदस्य प्रल्हाद कराडे, पं. स. सभापती सुनंदा हलामी, उपसभापती श्रीराम दुगा, शोएब मस्तान, आशाताई तुलावी, जयश्री धाबेकर, सरपंच अनुसया पेंदाम, गणपती नागोसे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पक्षप्रवेशामध्ये उमेश नंदनवार शाखा प्रमुख भाजप, ता. उपाध्यक्ष सुभाष गुंडरे, बाळू शेडमाके, प्रणव जंजी, उर्मिला पेंदाम, मनीषा पेंदाम, केशव दरवडे, रघुनाथ चंदनखेडे, नामदेव भानारे, श्रीकांत डिब्बे, गणी शेख, आसिफ शेख, भावना कोटांगले, मनोज वालदे, रुपेश मुंगणकर, आशाताई वाडगुरे, प्रीती गुंडरे, वंदना गुंडरे, शुभांगी शेडमाके, कौशल्या शेंडे, भूमिताई शेंडे, शेवंंता ईस्कये, श्रीकांत डिब्बे, भाग्यवान फायनवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा यात समावेश होता.