– वनविभाग गडचिरोली व वनव्यवस्थापन समितीने जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण उपक्रम केल्याचा आनंद
– गडचिरोली जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारा अभिनव उपक्रम
– आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतला जंगल सफारीचा आनंद
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला असून वनविभाग गडचिरोली व वनव्यवस्थापन समिती गुरवळा यांच्या वतीने सूरू करण्यात आलेल्या गुरवळा नेचर सफारी या जंगल पर्यटनाचा आनंद नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गुरवळा नेचर सफारीच्या जंगल पर्यटन प्रसंगी केले. यावेळी वनविभागाचे व वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सोबत होते.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा व वन्यजीव आहेत. मात्र अशा पर्यटन केंद्राची निर्मिती जिल्ह्यात न झाल्याने त्याचा आनंद जनतेला घेता आला नाही. परंतु गडचिरोली वनविभागाच्या माध्यमातून गुरवळा नेचर सफारी ही नवीन कल्पना राबविण्यात आल्याने आपल्या जिल्ह्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. हे पर्यटन गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठीच नाही तर देशातील नागरिकांनाही आकर्षित ठरेल अशी जंगल सफारी आहे. भविष्यात गडचिरोली जिल्ह्यासाठी हे पर्यटनाचे मोठे केंद्र ठरणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी आताच त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन जंगल सफारी केल्यानंतर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्हावासीयांना केले आहे.