विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून अहेरी तालुका पत्रकार संघटनेनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात 6 जानेवारीला सकाळी आदरांजली वाहून रुग्णांना अल्पोपहार म्हणून फळ वाटपाचा उपक्रम घेण्यात आला.
मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेला दर्पण वृत्तपत्राच्या माध्यमातून नवे दालन खुले करून दिले. अहेरीतील पत्रकारांकडून त्यांच्या आठवण प्रित्यर्थ पत्रकार दिनाचे कार्यक्रमातून स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. जाधव व बालरोगतज्ञ डॉ. हकीम यांच्या उपस्थितीत दर्पणकारांना पुष्पांजली वाहण्यात आली. तदनंतर रुग्णालयातील सर्व रुग्णांना अल्पोपहार म्हणून फळे व बिस्किटांचे वितरण करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष अमित बेजलवार, सचिव अशोक पागे, कोषाध्यक्ष विजय सुनतकर, सुरेंद्र अलोने, प्रकाश दुर्गे, सुधाकर उमरगुंडावार, संतोष मदिवार उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते जावेद अली, रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांची सहकार्याची भावना व रुग्णांना दिलासा पहावयास मिळाला. संचालन संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेंद्र अलोणे यांनी केले.