कन्नमवारनगर येथे खुल्या जागेच्या सौंदर्यीकरण बांधकामाचे भूमिपूजन

101

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहराच्या विकासाला गती मिळालेली असूून गेल्या ५ वर्षांंत झालेल्या विकास कामांनी शहराचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. शहरातील खुल्या जागेच्या सौन्दर्यीकरणाने शहराच्या सौन्दर्यात सुध्दा भर पडलेली आहे. शहराचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असल्याची ग्वाही नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी दिली.
नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. ५ मधील छत्रपती शाहू चौकातील कन्नमवार नगर येथील वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी (ठोक तरतूद)अंतर्गत श्री भोयर यांच्या घराजवळील खुल्या जागेच्या सौंदर्यीकरणाच्या बांधकामाचे व नंदनवन नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत जुना MSEB ऑफिस ते श्री चलाख यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नालीचे भूमिपूजन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बोलत होत्या.
सदर सौन्दर्यीकरण बांधकामाची अंदाजित रक्कम ३४.७२ लक्ष आहे.तर नाली बांधकामाची अंदाजित रक्कम 26 लक्ष असून १०२ मिटर लांबीचा बांधकाम आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेविका लताताई लाटकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर, राजेश मांदाळे, भोयर, डॉ. मडावी, यशवंत ढेंगे, बोबाटे, निलेश काबरा, दिलीप दुधबरे, रामदास चलाख, गोविंदा चिचघरे यांच्यासह वार्डातील नागरिक उपस्थित होते.