शाहूनगर प्रभाग क्र. ५ मध्ये नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते सीसी रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन

146

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या शाहुनगर प्रभाग क्र. ५ मध्ये सर्वसाधारण रस्ता निधी योजने अंतर्गत मुरली कावळे ते काटवे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते आज, १ जानेवारी रोजी नूतन वर्षाच्या शुभपर्वावर करण्यात आले. सदर रस्ता व नाली बांधकामाची अंदाजित रक्कम ३२ लाख ३० हजार रुपये एवढी असून १२० मीटर लांबीचा बांधकाम आहे. या रस्ता व नालीच्या बांधकामामुळे नागरिकांना ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेविका लताताई लाटकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर, ठाकरे, मुरली कावळे, उत्तम मेश्राम, कालिदास वाल्हदे, राजू बार, मधुकर विधाते, संजय बर्वे, सौ. बर्वे, ताराबाई ठाकरे यांच्यासह वार्डातील नागरिक उपस्थित होते. कंत्राटदार अजय तुम्मावार हे बांधकाम करीत आहेत.