गडचिरोली शहराच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

126

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते सुभाष वार्ड येथील जलकुंभाचे लोकार्पण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष म्हणून मी निवडून आल्यानंतर गडचिरोली शहरातील विकास कामांना गती मिळाली. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेन्द्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना व सुधीरजी मुनगंटीवार हे अर्थमंत्री असताना खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्यासह मी स्वतः फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी भरपूर निधी खेचून आणला. सुभाष वार्ड येथे पिण्याच्या पाण्याची समस्या होती. ती समस्या जाणून घेवून तिथे जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. जो गडचिरोली शराचा विकास या ३० वर्षांंत झालेला नाही तो ५ वर्षांंच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात झालेला आहे. यापुढेही मी शहराच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.
स्थानिक सुभाष वार्ड जलशुद्धीकरण केंद्र आठवडी बाजार बोरमाळा रोड येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत अंदाजित रक्कम २.६ कोटी रुपयांचे जलकुंभ व वाढीव पाईप लाईन बांधकाम पूर्ण झाले आहे. आज आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते जलकुंभाचे व वाढीव पाईप लाईनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्ष पिपरे बोलत होत्या.
पुढे बोलताना नगराध्यक्ष पिपरे म्हणाल्या की, शहरात ३ कोटींचे आठवडी बाजार दुकान गाळे, ५ कोटींचे खुल्या जागेचे सौन्दर्यीकरण, ९६.५० कोटींची भूमिगत गटार लाईन, ५० कोटींचे मुख्य रस्ते व नाली बांधकाम, २ कोटींचे सुभाष वार्ड, लांजेडा वार्ड, विसापूर व फुले वार्ड येथे पांदन रस्ते, २ कोटींचे घनकचरा व्यवस्थापन, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत लाभार्त्यांना घरकूल मिळाले असून १०० घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. अत्याधुनिक स्मशानभूमी तसेच शहरात विविध विकासकामे या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात झालेली आहेत. महाविकास आघाडी सरकारची सत्ता प्रस्थापित होवून २ वर्ष पूर्ण झालेली आहेत. परंतु अजूनपर्यंत गडचिरोली नगरपरिषदेला शहर विकासासाठी एकही रुपयांंचा निधी दिलेला नसल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले की, गडचिरोली शहराचा विकासात्मक चेहरा बदलविण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही केंद्रबिंदू ठरलेली आहे. शहरात गेल्या ३५ वर्षांंमध्ये जी विकासकामे झालेली नाहीत ती या ५ वर्षांंत झालेली आहेत. महाविकास आघाडी सरकार हे लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आ. डॉ. होळी यांनी उद्घाटनीय भाषणात केला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, शिक्षण सभापती वर्षा नैताम, नगरसेविका वैष्णवी नैताम, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, नगरसेवक रमेशजी भुरसे, केशव निम्बोड, नगरसेविका अल्काताई पोहनकर, निताताई उंदिरवाडे, लताताई लाटकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, समाजसेवक विलास नैताम, देवाजी लाटकर, बारसागडे, रोशनी बानमारे, पूनम हेमके, एकनाथ गुरनुले, वैशाली गव्हारे, कैलास जुवारे, प्रकाश भुरले, ममता चापले, वनिता चापले, अल्का कुनघाडकर, कविता भांडेकर, रमेश बोधलकर, मीराबाई चापले, मंगला नैताम, गजानन चिचघरे, मनोज भांडेकर, सुरेश भांडेकर, राजू भांडेकर, महादेव बोबाटे, सागोजी गुरनुले व सुभाष वार्ड येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अभियंता अंकुश भालेराव यांनी केले.