आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते पिंपळगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

76

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव येथील धान खरेदी केंद्राचा शुभारंभ आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. देसाईगंज तालुक्यात एकमेव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पिंपळगाव येथे खरेदी केंद्र आहे. मात्र येथे गोदामाचा अभाव असल्याने कोरेगावमधील गोदामात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी संस्थेचे सभापती कृष्णा भोयर, उपसभापती रागोजी कुंबरे, आदिवासी उपप्रादेशिक व्यवस्थापक सोनवणे, कोरेगाव येथील उद्योगपती दिनेश कुर्जेकर, गोपाल राऊत, यादव घरत, व्यवस्थापक विश्वनाथ मडावी, केंद्रप्रमुख शिशुपाल राऊत, राजेंद्र दिघोरे, विलास बनसोड, होमदेव पाटील नाकाडे व शेतकरी उपस्थित होते.