हा विजय एक वर्षांपासूनच्या शेतकऱ्यांच्या संघर्षतेचा आणि एकजुटीचा विजय आहे : महेंद्र ब्राम्हणवाडे

126

– जिल्हा काँग्रेसच्या वतीने किसान विजय दिवस साजरा

गडचिरोली : केंद्र सरकारने नुकताच तिन्ही कृषी कायदे रद्द केले. या निर्णयाचा स्वागत करत जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत “किसान विजय दिवस” साजरा करून जल्लोष साजरा करण्यात आला व उपस्थित शेतकरी बांधवाना मिठाई वाटण्यात आली. हा विजय एक वर्षांपासूनच्या शेतकऱ्यांच्या संघर्षतेचा आणि एकजुटीचा विजय आहे आणि जोपर्यंत संसदेत हे तिन्ही काळे कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी यावेळी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, माजी न. प. अध्यक्ष तथा जि. प. स. अँड. रामभाऊ मेश्राम, प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश महासचिव डॉ. नितीन कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, प्रदेश महासचिव डॉ. चंदाताई कोडवते, अतुल मलेलवार, प्रदेश महासचिव सोशल मीडिया नंदूभाऊ वाईलकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, अनुसूचित सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आशीष कांबळी, सुभाष धाईत, जितेंद्र मुनघाटे, ता. अ. नेताजी गावतुरे, माजी जि. प.अध्यक्ष सोमय्या पसुला, हरबाजी मोरे, वसंत राऊत, दिवाकर निसार, कृष्णाजी झंजाळ, श्यामराव चापडे, सुनील डोगराज, नंदू कायरकर, घनश्याम मुरवतकर, माजीद शेख, कल्पक मुुुप्पीडवार, बाशीत शेख, रुपेश टिकले, अविनाश साळवे, योगेश नैताम, सूरज मडावी, रुपचंद उंदिरवाडे, नामदेव उडाण, गोपाल आंबोरकर, प्रभाकर कुबडे, आबाजी आंबोरकर, राकेश रत्नावार, चारुद्दत पोहणे, नंदू कथले, अजय भांडेकर, परशुराम गेडाम, सुनील तूमराम, शिवदास गुरनुले, उष्ठू भोयर, अनिल कावळे, मनोहर गेडाम, जोगेश्वर दुधे, ठेमाजी निमगडे, हिरा सावसागडे, धिवरू दुर्गे, देवानंद कुमरे, गुरुदास ठाकरे, ढिवरु मेश्राम, बाळू मडावी, प्रतीक बारसिंगे, गौरव येनप्रड्डीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, सुनीता रायपुरे , लताताई मुरकुटे, कुमरे, नीता वडेट्टीवार, स्मिता संतोषवार, वर्षा गुलदेवकर यासह अनेक शेतकरी बांधव, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.