नंदूजी धंदरे यांचे निधन

111

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथील रहिवासी नंदूजी तुकाराम धंदरे यांचे रविवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ४७ वर्षांचे होते. रविवारी पहाटे त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने सकाळी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी गावाजवळील वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने धंदरे परिवारावर मोठा आघात झाला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.