सुमित खेवले यांचा काँग्रेस पक्षाने केला सत्कार

240

गडचिरोली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक व राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या पात्रतापूर्व परीक्षेत चामोर्शी येथील जिल्हा परिषद शाळेतील सहायक शिक्षक श्रीरंग खेवले यांचा मुलगा सुमित खेवले 720 पैकी 606 गुण घेऊन त्यांनी यश संपादन केल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा निरीक्षक शिवाराव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रा. रमेश चौधरी, जिल्हा सचिव सुनिल चडगुलवार, चितारकर, माजी नगरसेवक अविनाश चौधरी, राकेश खेवले, रामदास कुकुडकार, केशरी चौधरी व सुमितचे आईवडील उपस्थित होते.