गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजूर करा : आमदार डॉ. देवराव होळी

83

– वैद्यकीय शिक्षणमंत्री अमितजी देशमुख यांच्याशी मुंबईत केली चर्चा

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथे नविन मेडिकल कॉलेज मंजुर करावे याकरिता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमितजी देशमुख यांच्याशी मुंबई येथे चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून मेडिकल कॉलेज मंजुर करावे, अशी जिल्हा वासियांची मागणी आहे. राज्य सरकारने गडचिरोली येथे लवकरच मेडीकल कॉलेजला मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे जिल्हा वासियांची घोर निराशा झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन गडचिरोली येथे नवीन मेडिकल कॉलेज मंजुर करावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमितजी देशमुख यांच्याकडे केली आहे.