दिभना येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे उपसभापती विलास दशमुखे यांच्या हस्ते भूमिपूजन

120

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील दिभना येथे गडचिरोली पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे यांच्या प्रयत्नाने आ. डॉ. देवरावजी होळी यांनी २५१५ च्या निधीमधून मंजुर केले. या कामाचे भूमिपूजन उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांंच्या हस्ते सरपंच रमेश गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली, तालुका भाजपा महामंत्री हेमंत बोरकुटे, ग्रामपंचायत सदस्य जेंंगठे, जेष्ठ नेते बालाजी पा. जेंगठे, ग्रामसेविका श्रीमती वासंती देशमुख, ग्रामपंचायत सदस्य धनराज जेंंगठे, राजु जेंगठे, श्रीमती चंदाताई जेंगठे, श्रीमती नैताम उपस्थितीत पार पडले. यावेळी सरपंच व सचिव यांनी गावातील समस्या अवगत केल्या. यावर उपसभापती यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या अगोदर आ. डॉ. देवरावजी होळी यांचे स्थानिक विकास निधीतून १० लक्ष रुपयांंचा सिमेंट – काँंक्रीट रस्ता दिल्याबद्दल आमदार महोदयांचे आभार मानले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थितीत होते.  कार्यक्रमाचे संचालन व आभार सचिव श्रीमती वासंती देशमुख यांनी केले.