बिनारानी होळी यांच्या वतीने आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्याकरिता हळदीकुंकू कार्यक्रम

80

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या सौभाग्यवती सौ. बिनारानी होळी यांचा उपक्रम

– आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गावांमध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सौभाग्यवती सौ. बिनाराणी देवरावजी होळी यांनी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला आशा वर्कर व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

नव्या वर्षाचा पहिला आणि सर्वांचा आवडता सण मकरसंक्रांती. पतंग उडविणे, तिळगुळ वाटणे, असा हा रंगबिरंगी सण आपल्या आयुष्यात नवीन उत्साह घेऊन येतो. यानिमित्ताने मातृशक्ती हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजीत करीत असते त्याचे साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील, आशावर्कर व गटप्रवर्तन व चामोर्शी तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.