आमदार नागो गाणार यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनीच कामाला लागावे : आमदार डॉ. देवरावजी होळी

72

– महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २१ जानेवारी २०२३ : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत भाजपा समर्पित उमेदवार आमदार नागोजी गाणार यांना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीच्या प्रसंगी केले.

यावेळी बैठकीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोलीचे गुरुदेवजी चापले, नरेंद्रजी बोरकर, अजयजी अमृतकर, भाजपाचे जिल्ह्याचे महामंत्री प्रमोदजी पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, तालुक्याचे संपर्कप्रमुख विलासजी भांडेकर, ज्येष्ठ नेते बंडूजी झाडे यांच्यासह शिक्षक परिषदेचे व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अतिशय शिस्तप्रिय, साधी संयमित राहणी असलेले, शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने धडपडणारे, विधानसभेमध्ये शिक्षकांच्या मागण्यांसाठी सतत आवाज उठवणारे कर्तृत्ववान आमदार नागोजी गाणार आहेत. त्यांच्या सारखा उमेदवार पुन्हा विधान परिषदेत पोहोचण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याकरिता त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक शिक्षक मतदारांपर्यंत भाजपाच्या व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पोहोचण्याची आवश्यकता असून आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मा. आमदार नागोजी गाणार यांना निवडून आणण्यासाठी आपली पूर्ण शक्ती कामाला लावावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.