विदर्भ क्रांती न्यूज
गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्थानिक नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात भूगोल दिवसानिमित्त भूगोल विभागाच्या वतीने अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात प्रतिकृती व नकाशा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. गुणवत्ता आणि कौशल्याचा वापर करून विध्यार्थ्यानी प्रतिकृती आणि नकाशा प्रदर्शनीत सहभाग नोंदविला.
गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून व प्रदर्शनीचे परिक्षक म्हणून राजाभोज शासकीय महाविद्यालय कटंगीचे (मध्यप्रदेश) प्राचार्य डॉ. अनिल शेंडे, जगत महाविद्यालय, गोरेगावचे डॉ. रवी साखरे, प्रा. के. टी. बिसेन तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. एस. यु. खान डॉ. अर्चना जैन, डॉ. राकेश खंडेलवाल उपस्थित होते.
विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अतिथीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भूगोल विषयाचे मानवी जीवनाशी असलेले सहसंबंध व भविष्यातील उत्कर्षाच्या संधीवर प्रकाश टाकला. के. टी. बिसेन यांनी सी. डी. देशपांडे यांचे भूगोल विषयातील कार्याचे महत्त्व व ऋतुचक्राच्या बदलाचे मकरसंक्रांतीशी असलेले संबंध विद्यार्थ्यांना पटवून दिले. भूगोल विषयातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील आंतरीक कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशा प्रदर्शनीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.अनिल शेंडे यांनी केले. डॉ. रवी. साखरे यांनी भूगोल विषय अभ्यासक्रमात आधुनिक व शास्त्रीय दृष्टिकोन रुजविण्यासाठी आपण प्रयत्न करणे का गरजेचे आहे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनीमध्ये 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मान्यवरासमोर प्रतिकृतिचे सादरीकरण केले. प्रतिकृतीमध्ये प्रथम क्रमांक गौरव दुंडेश्वर, पुजा पंधरवार, रामकिशन लिल्हारे, द्वितीय काजल नागपुरे, यशकुमार आगडे, खुशबु रहांगडाले आणि तृतीय क्रमांक प्रियंका निखाडे यांनी प्राप्त केले. विजेत्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. संतोष चोपकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. माया अंभोरे यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. आर. मोहतुरे डॉ. एच. पी. पारधी, डॉ. के. वासनिक डॉ. ए. ओ. बाकरे, डॉ. एस. चौरे, डॉ. एफ. एम. शहा, प्रा. योगेश भोयर व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. रवी रहांगडाले, प्रा. बालपांडे, प्रा. प्रवीण टेंभेकर, प्रा. अर्चना अंबुले, प्रा. लोकेश कटरे, प्रा. रितु तुरकर, प्रा. रितेश चौरावार, प्रा. विक्रम प्रित्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभागातील प्रा. तारेंद्र पटले, प्रा. विजय पोचाटे, प्रा.अंकीत जायसवाल तसेच, शामलाल ठाकरे यांनी विशेष सहकार्य केले.